Tag: annasaheb patil mahamandal yojna

  • अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ असा घ्या | Annasaheb Patil Mahamandal Binvyaji Karj Yojna 2025

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ असा घ्या | Annasaheb Patil Mahamandal Binvyaji Karj Yojna 2025

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना Annasaheb Patil Mahamandal Karj Yojna

    मित्रानो जेव्हा कोणी पण नवीन करायचा विचार करतो त्या व्यक्ती पुढे सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे भांडवल आणि हि समस्या जे लोक सर्व सामान्य घरामधून येतात त्यांच्या पुढे हि सर्वात जास्त भासते आणि हि अडचण भासल्या मूळे बरेच जण हे विविध बँकांचे कर्ज काढतात किव्हा कोणत्या तरी सावकारी करणाऱ्या लोकाकढून जास्त % व्याज दराने पैसे घेतात पण हे पैसे घेणे सुद्धा सोपे नाहीये अपुरे पैसे पडल्या मूळे अनेक जणांचे मोठे उद्योग स्थापन करायचे स्वप्न हे स्वप्न च राहते आणि त्यांच्या हाती फक्त निराशा मिळते पण आता हतबल होण्याची गरज नाहीये आता खास महाराष्ट्र सरकारने तुमच्या साठी १५ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज योजना सुरु केलेली आहे जर तुमचा उद्योग हे जरा मजबूत योजनेने बनलेले असले आणि तुम्ही त्याची खात्री पटवून देऊ शकत असाल तर तुम्ही या रक्कमेचा उपयोग करून घेऊ शकतात ते सुद्दा बिनव्याजी, आणि त्या बिनव्याजी महामंडळाचे नाव आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना काय आहे ?

    • महाराष्ट्र सरकारने २७ नोव्हेंबर १९९८ रोजी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जे नवीन तरुण स्वतःचा उद्योग चालू करू इच्छितो आहेत अश्या तरुण साठी बिनव्याजी कर्ज त्याना पुरविणे हे होय, याच्या मधून हे नवीन तरुण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करून नव्या उंचीपर्यंत पोहचवू शकतील अश्या तरुणांना १५ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्द करून देते, हे राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार, तरुण किव्हा तरुण जे आधी पासून कोणत्या तरी व्यवसायात आहेत त्यांच्या साठी भक्कम आर्थिक मदत पुरविते.

    अण्णासाहेब पाटील महामंडळाचे निकष आणि अटी

    • सर्व प्रथम अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र चा रहिवासी असला पाहिजे
      सादर योजने अंतर्गत अर्ज करणारा व्यक्ती हा पुरुष हा जास्तीत जास्त ५० वर्षाचा असावा आणि स्री हि ५५ वर्ष पर्यंत असणे गरजेचे आहे आणि कमीत कमी वय डोगासाठी हे १८ वर्ष आहे
      अर्ज करणारा व्यक्ती याने या पूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळ कडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
      एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजने साठी एके वेळी हा पात्र ठरतो
      जर तुम्ही या आधी कोणता बिझनेस किव्हा उद्योग करत असाल तर तुमच्या कडे उद्योग आधार आणि शॉप ऍक्ट लायसन असणे गरजेचे आहे
      या योजने साठी अर्ज करणारा व्यक्ती हा किमान १०वी उत्तीर्ण असणे फार गरजेचे आहे
      अण्णासाहेब पाटील योजने ला अर्ज करण्या अगोदर जर तुम्ही कोणत्या बँके चे लोण काढले असले तर ते नीट व्यवस्थित रित्या पाने भरलेले असावे आणि किव्हा ते निल असणे फार गरजेचे आहे
      तुमचं वार्षिक उत्पन्न हे ८ लाख च्या आता असंले पाहिजे

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजने साठी आवश्यक कागदपत्रे

    • आधार कार्ड
      रेशन कार्ड
      पॅन कार्ड
      रहिवाशी प्रमाणपत्र
      वार्षिक उत्पन्नाचा दाखला
      जातीचे प्रमाणपत्र
      पासपोर्ट साईझ चा फोटो
      बँक खाते ची सर्व माहिती
      स्वतःचा मोबाईल नंबर
      स्वतःचा ई-मेल आयडी
      तुमच्या स्वतःच्या बिझनेस बद्दल सर्व रीतसर आणि सविस्तर माहिती

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा

    • तर सुरुवातीला तुम्ही उद्योग.महास्वयं.गोवा.इन या अधिकृत वेबसाइट वरती येयचे आहे ते पेज ओपन झाल्यावर तिथे तुमची सर्व माहिती भरून घेयची आहे आणि ती माहिती रीतसर भरल्या नंतर ती पुन्हा चेक करून तुम्ही सबमिट च्या बट्टण वरती क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी तुमचा उशीर आयडी आणि पासवर्ड तयार होईल तो सेव्ह करून ठेवायचा
      पुन्हा तो युझर आयडी आणि पासवर्ड होमी पेज वरती येऊन टाकायचा आहे आणि पुन्हा त्याने लॉग इन करायचे आहे समोर तुम्हाला ३ कर्ज च्या योजना दिसतील आणि जी योजना अंतर्गत तुम्हाला कर्ज घेयचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि त्या ठिकाणी अर्ज दारास त्याची सर्व माहिती भरून घेयची आहे आणि त्यानंतर त्याचा अर्ज हा सादर होईल आणि त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस होईल.