ठिबक सिंचन चे अनुदान काय आहे आणि ते कसे मिळवावे काय आहे त्याची सर्व जाऊन घेऊया सर्व प्रथम हे जाणून गया कि ज्या ठिबक वरती इसी मार्क आहे अश्याच ठिबक सिंचन ला अनुदान मिळते. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन साठी सध्या महाराष्ट्र मध्ये दोन्ही साठी Online फॉर्म भरणे चालू आहे तर आज आपण ठिबक सिंचन चे अनुदान कसे मिळवावे हे पाहणार आहोत
मुख्यमंत्री ठिबक सिंचन अनुदान योजना माहिती
- ठिबक सिंचन अनुदान हे अल्पभूदारक शेतकऱ्यांना म्हणजे जे अशे शेतकरी ज्यांची शेत जमीन हि ५ ऐकर च्या खाली आहे अश्या शेतकऱ्यांना ८०% अनुदान ची तरतूद महाराष्ट्र सरकार द्वारे केली जाते
- जे शेतकरी ज्यांची शेत जमीन हि ५ ऐकर च्या वरती आहे अश्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ७५% अनुदान ची तरतूद केलीली आहे
- काही शेतकरयांनी पहिले तुषार सिंचन च्या अनुदानाचा लाभ घेतलेला होता आणि त्याना ठिबक सिंचन च्या अनुदान साठी अपात्र घोषित करण्यात आले होते पण आता तसे नाहीये ज्या शेतकऱ्यांनी पहिले म्हणजे ३ वर्ष पूर्वी तुषार सिंचन चा लाभ घेतला होता आता अश्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन चा देखील लाभ घेता येणार आहे
ठिबक सिंचन अनुदान अटी
- ठिबक सिंचन साठी तुम्ही गेले ७ वर्ष पासून त्या क्षेत्रा वरती कोणतेही अनुदान घेतलेले नसावे
- तुम्ही अर्ज करताना तुम्ही किमान २० गुंठे क्षेत्रा साठी अर्ज केला पाहिजे त्या खालील तुमचे क्षेत्रा नसावे
ठिबक सिंचन अनुदान आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- ७\१२ ची प्रत
- खाते उतारा
ठिबक सिंचन चा Online अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या MAHADBT या Online पोर्टल वरती जाऊन सुरुवातीला आपली माहिती भरून घेयची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी आवश्यक कागदपत्रे सांगितले आहेत ती त्या वरती अपलोड करायची आहेत